Posts

Showing posts from June, 2022

उन्हाळी भुईमूग समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिकांवर "शेती दिन" साजरा

Image
 उन्हाळी भुईमूग समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिकांवर "शेती दिन" साजरा  संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि नांदेड कडून राष्ट्रीय तेलबिया पिके अभियानांतर्गत उन्हाळी भुईमूग समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके मौजे अंबुलगा तालुका मुखेड येथे उन्हाळी हंगामात 10 हेक्टर 25 शेतकऱ्यांकडे  लागवडीचा "घुगे पॅटर्नचा" अवलंब करून प्रात्यक्षिक घेण्यात आले होते.सध्या प्रत्यक्ष पिकाची काढणी चालू आहे शेतकऱ्यांना सरासरी 12 ते 15 क्विंटल प्रति एकरी उत्पादकता मिळत आहे, जे की सरासरी उत्पादकता पेक्षा अधिक आहेत. या शेती दिन कार्यक्रमात प्रात्यक्षिकातिल शेतकरी श्री दिगंबर कदम यांनी "घुगे पॅटर्न" चे स्व अनुभव कथन केले . कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व सहकारी श्री तुकाराम मंत्री यांनी शेतकऱ्यांना  परंपरागत लागवड पद्धत व घुगे पॅटर्न यातील बदलाविषयी जागृत केले व याचा अवलंब मोठ्या प्रमाणात करण्याचे आव्हान केले. या शेती दिन कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला

गरीब कल्याण संमेलन व खरीप शेतकरी मेळाव्यास सगरोळी येथे हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती....!

Image
  गरीब कल्याण संमेलन व खरीप शेतकरी मेळाव्यास सगरोळी येथे हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती....! केंद्र शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहचाव्यात किंबहुना त्याचा किती लाभ होत आहे हे जाणून घेण्यासाठी तसेच खरीप पूर्व पिकांचे लागवड तंत्रज्ञान प्रसारासाठी मंगळवार ,दि.३१ मे 2022 रोजी संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड येथे गरीब कल्याण सम्मेलन व खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .ह्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमासाठी मा.पंतप्रधानांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे योजना लाभार्थ्यांशी व उपस्थित शेतकऱ्यांची संवाद साधला.या कार्यक्रमाचे प्रसारण व आयोजन संस्कृती संवर्धन मंडळ कृषि विज्ञान सगरोळी जि नांदेड तर्फे करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी 16 योजनांची मागील 8 वर्षातील आढावा मा. पंतप्रधानांनी देशासमोर मांडला व आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी योजनांची भूमिका विशद केली. व्हिडिओ काॅन्फरन्सिंग संवादानंतर शिवस्पर्श शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री.रतन गिरी यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे शेतीतील विविध प्रयोगाची माहिती शेतकऱ्यांना दिली. तर कृषी ...

समतोल आहाराचे महत्त्व….

Image
  समतोल आहाराचे महत्त्व….. मुलांची शारीरिक वाढ व बौद्धिक विकास यांचा संबंध सरळ आहाराशी असतो. तसेच कमी वयात लागलेल्या आहाराच्या सवयी व आवडीनिवडी नेहेमी साठी राहतात. म्हणूनच त्यांच्या आहाराचे नियोजन करणे आवश्यक आहे. पोषणमूल्यांच्या अभावामुळे शाळेतील मुलांना बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागते व याचा परिणाम त्यांच्या भावी आयुष्यावर पडतो. शाळकरी मुलांना योग्य पद्धतीने आहाराचे महत्त्व समजून सांगितल्यास त्याचा चांगला परिणाम त्यांच्या रोजच्या खाण्याच्या सवयी वर झालेला आढळतो. याच उद्देशाने दिनांक 4 मे 2022 रोजी सगरोळी येथे संस्कृती संवर्धन मंडळ आयोजित समर कॅम्प मध्ये डॉ. माधुरी रेवणवार यांनी मुलांना "समतोल आहाराचे महत्त्व" बौद्धिक खेळ, व्हिडिओ आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे समजाऊन सांगितले. या प्रसंगी समर कॅम्प मध्ये सहभागी 105 विद्यार्थि उपस्थित होते. कार्यक्रमानंतर खेळामध्ये नंबर आलेल्या 9 विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून छोटे बक्षीस देखील देण्यात आले. #children #diet #plan #summercamp2022 #SummerCamp #balance_diet #kvk #sagroli #nanded #swimming #horseriding #Advent...